Yamaha FZ-X Chrome Edition : KMT ला पाणी पाजणार ही अपडेटेड बाईक, यामध्ये आहेत आधुनिक फीचर्स

Yamaha FZ-X Chrome Edition
Yamaha FZ-X Chrome Edition : KMT ला पाणी पाजणार ही अपडेटेड बाईक, यामध्ये आहेत आधुनिक फीचर्स

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या मोबिलिटी एक्सपो 2024 मध्ये त्यांच्या दोन नवीन कलर ऑप्शनसह Yamaha FZ-X प्रसिद्ध मॉडेल लॉन्च केले आहे. यामाहाची ही बाईक लवकरच बाजारात विक्रीसाठी आणली जाईल. ही बाईक थेट KTM शी स्पर्धा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

यामाहाची ही बाईक नवीन कलर ऑप्शन, नवीन डिझाईन ग्राफिक्स आणि कॉस्मेटिक चेंजेस घेऊन लॉन्च करण्यात आली आहे. ही बाईक भारतीय बाजारात खूप पसंत केली जाते, बोलले जात आहे की यातील अपडेट मुळे या बाईची विक्रीमध्ये वाढ होणार आहे.

Yamaha FZ-X Chrome Edition फीचर्स

Yamaha FZ-X Chrome एडिशन मध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेण्यात आला आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अ‍ॅलर्ट, एसएमएस अलर्ट, ईमेल नोटिफिकेशन आणि त्यासोबतच बॅटरी स्टेटस पाहता येते. यामधील फीचर्सनुसार तुम्हाला इंधन स्टेटस, देखभाल शिफारसी त्यासोबतच बाईक मधील असणारे इंटरनल प्रॉब्लेम दर्शविते.

Yamaha FZ-X Chrome Edition  इंजिन

जर आपण यामाहा एफझेड-एक्सच्या इंजिनबद्दल बोललो तर त्यासह 149 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन उपलब्ध आहे. जे 5 स्पीड गियरबॉक्सशी जोडलेली आहे. हे इंजिन 7,250 आरपीएम वर 12.2BHP उर्जा आणि 5,500 आरपीएम वर 13.3 nm टॉर्क तयार करते.

यामध्ये एक लिटर पेट्रोलमध्ये 48 ते 50 किलोमीटर मायलेज मिळेल. या मोटारसायकलचे एकूण वजन 149 किलो आहे. आणि हे 10 लिटर इंधन टाकी क्षमता प्रदान करते.

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन 

हे एफझेड-एक्स सस्पेंशन सेटअपमधील फ्रंट-साइड टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील सात-चरण प्रीलोड-समायोज्य मोनो-शॉकद्वारे हाताळले जाते. आणि त्याचे ब्रेकिंग फंक्शन करण्यासाठी, दोन्ही चाकांवर सिंगल डिस्क ब्रेक जोडले गेले आहेत. त्याची सुरक्षा सुविधा अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम, सिंगल चॅनेल एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल सारखी सुविधा प्रदान करते.

Yamaha FZ-X Chrome Edition किंमत

Yamaha FZ-X Chrome Edition मॉडेल दोन नवीन कलर ऑप्शन मध्ये घेऊन आले आहेत ज्यामध्ये फ्लॉवर क्रोम आणि ब्लॅक पेंट ऑफर केले जाईल. एफझेड-एक्स भारतीय बाजारात दोन प्रकारांसह उपलब्ध आहे ज्यात त्याच्या स्टॅंडर्ड ची किंमत 1.37 लाख रुपये आहे आणि याच्या टॉप वेरियंटची किंमत 1.38 लाख एक्स-शोरूम आहे.

Tecno Spark 20 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत पाहून युजर्स झाले हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *