Xiaomi 14 हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप

Xiaomi 14
Xiaomi 14 हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप

भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी त्यांचा स्मार्टफोन दमदार ठरवा या हिशोबाने भारतीय बाजारपेठेत लॉन्च करते. प्रत्येक स्मार्टफोन मध्ये काही ना काही तरी वेगळे फीचर्स दिले गेले असतात. अशा दमदार स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Xiaomi ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार बॅटरी बॅकअप साठी आणि कॅमेरा कॉलिटी साठी ओळखले जातात.

या स्मार्टफोन कंपनीचा Xiaomi 14 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा खूपच सुंदर अशा प्रकारे आनंद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Xiaomi 14 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.36 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1200 x 2670 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये octa -core प्रोसेसर आणि Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे पाच व्हेरिएंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला गेला आहे. तसेच स्मार्टफोनच्या डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass Victus हा ग्लास दिला गेला आहे.

Xiaomi 14 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी संबंधित विचार केला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नाही तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4610mAH ची बॅटरी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 31 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – पाडव्यानिमित्त vivo X Fold3 Pro हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 14 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 74,499 रुपये एवढी ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Black, White, Jade Green, Pink या चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठेवू शकतो.

Poco M6 या स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर ऑफर, जाणून घ्या कमी झालेल्या किमती बद्दल माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *