पाडव्या निमित्त vivo X Fold3 Pro हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

vivo X Fold3 Pro
पाडव्यानिमित्त vivo X Fold3 Pro हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारतीय बाजारपेठेत बऱ्याच स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी आपल्या कंपनीचे नाव मोठे करण्यासाठी तसेच आपल्या कंपनीचे स्मार्टफोन युजर्स कोणत्या फीचर्स मध्ये मागे पडू नयेत यासाठी कार्यरत असते. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीला असे वाटते की आपण लॉन्च केलेले सर्व स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन युजर्सनी मोठ्या प्रमाणावर वापरले पाहिजेत. अशा बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक vivo ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी साठी ओळखले जातात.

या स्मार्टफोन कंपनीचे स्मार्टफोन युजर्स बाजारपेठेत ताठ मानेने चालतात. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा vivo X Fold3 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.vivo X Fold3 Pro या स्मार्टफोन मध्ये आपल्याला ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

vivo X Fold3 Pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8.03 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोन चा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले Foldable असल्यामुळे स्मार्टफोन प्रेमींचे मन खूपच आकर्षित करतो. हा स्मार्टफोन 2200 x 2480 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. हा स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असू शकतो.

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM8650-AB Snapdragon 8 Gen 3 हा चीप सेट दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला जाऊ शकतो.

vivo X Fold3 Pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 64 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप असू शकतो, यामध्ये एलईडी फ्लॅशचा देखील समावेश असेल. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला फोटोग्राफीचा उत्कृष्ट आनंद घेता येईल.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5700mAH ची बॅटरी 100W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. कंपनीने असा दावा केला आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 31 मिनिटांमध्ये 100 % चार्ज होऊ शकतो.

vivo X Fold3 Pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 1,15,499 रुपये एवढी ठेवली जाऊ शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला Black, White या दोन कलर ऑप्शन मध्ये मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा असा दमदार स्मार्टफोन घ्यायचा असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Xiaomi 14 हा स्मार्टफोन येऊन धडकला भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *