Vivo X 100 pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल चा ट्रिपल कॅमेरा सेटअप

Vivo X 100 pro
Vivo X 100 pro हा स्मार्टफोन झाला लॉन्च, स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सल चा ट्रिपल कॅमेरा सेटअप

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये काही ना काही तरी वेगळे असते, आणि दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन खूपच केले जातात. असाच एक दमदार स्मार्टफोन vivo या स्मार्टफोन कंपनीने लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव vivo X 100 pro असे आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला उत्तम दर्जाचे कॅमेरा दिल्या गेला आहे. कॅमेरा कॉलिटी सोबतच या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप देखील अतिशय सुंदर आहे.

केवळ हा स्मार्टफोन नाही तर कंपनीने त्यांच्या आत्तापर्यंतच्या सिरीज मधील काहीतरी वेगवेगळे फीचर्स त्यांच्या स्मार्टफोन प्रेमींना पुरवले आहेत. हा स्मार्टफोन देखील खूपच आकर्षक डिझाईन सह येतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Vivo X 100 pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सेल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 9300 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 256GB 16GB RAM, 512GB 16GB RAM, 1TB 16GB RAM इंटरनेट स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला गेला आहे.

Vivo X 100 pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅशचा ही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 5400mAH ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 12 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Nokia Play 2 Max लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत, स्मार्टफोन प्रेमी बघत आहेत वाट

Vivo X 100 pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 61,999 रुपये एवढी ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला Startrail Blue, Asteroid Black, Sunset Orange, White या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा दमदार कॅमेरा क्वालिटी साठी नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Honor X9b हा स्मार्टफोन घालतोय भारतीय बाजारपेठेत धुरळा, जाणून घ्या फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *