Vivo V30 : 50 MP सेल्फी कॅमेरा, Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असा पावरफुल स्मार्टफोन झाला लॉन्च

Vivo V30
Vivo V30 : 50 MP सेल्फी कॅमेरा, Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असा पावरफुल स्मार्टफोन झाला लॉन्च

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांचे नवीन दमदार कॅमेरा कॉलेटी आणि फीचर्स असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Vivo या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी साठी ओळखले जातात. या कंपनीचे स्मार्टफोन फोटोग्राफी प्रेमींसाठी खूपच महत्त्वाचे योगदान देतात. या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा Vivo V30 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे.

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 50 मेगापिक्सलचा दमदार असा फ्रेंड कॅमेरा ही दिला गेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबद्दल अधिक माहिती.

Vivo V30 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जॉकी 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह दिला गेला आहे. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm Snapdragon 7 Gen 3 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार वेरियंट पाहायला मिळतात. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर ही देण्यात आला आहे.

Samsung Galaxy XCover 7 : लोखंडासारखा मजबूत हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि किंमत पहा

Vivo V30 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅशचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 50 मेगापिक्सलचा दमदार असा फ्रंट कॅमेरा ही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी 5000mAH ची बॅटरी 88W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 48 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

Vivo V30 किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत 33,990 रुपये असू शकते. हा स्मार्टफोन आपल्याला Bloom White, Waving Aqua, Lush Green, Noble Black या चार कलर व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Realme Note 1 5G हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, मिळतोय 108 मेगापिक्सल चा दमदार कॅमेरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *