Vivo या स्मार्टफोन कंपनीने गुपचूप लॉन्च केला Vivo V30 5G हा स्मार्टफोन, भारतीय बाजारपेठेत उडतोय धुमाकूळ

Vivo V30 5G
Vivo या स्मार्टफोन कंपनीने गुपचूप लॉन्च केला Vivo V30 5G हा स्मार्टफोन, भारतीय बाजारपेठेत उडतोय धुमाकूळ

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Vivo या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून त्यांच्या स्मार्टफोन युजर च्या मनावर खूपच राज्य केले आहे. या कंपनीचे सर्व स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि दमदार अशा बॅटरी बॅकअप सह ओळखले जातात. या स्मार्टफोन कंपनीचा Vivo V30 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये तसेच इंडोनेशिया, हॉंगकॉंग, मलेशिया, सिंगापूर, थायलंड अशा सर्व बाजारपेठांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, असे या स्मार्टफोन कंपनीने सांगितले आहे.

या स्मार्टफोन कंपनीने या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि लिक झालेल्या किमती विषयी अधिक माहिती.

Vivo V30 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 2800 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1260 x 2800 एवढ्या पिक्सल रिझर्वेशन सह येतो. हा स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित असून, या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm Snapdragon 7 Gen 3 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे चार विरियंट पाहायला मिळू शकतात. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो.

Vivo V30 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एल इ डी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी आणि 80W चा फास्ट चार्जर ही दिला जाऊ शकतो. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 48 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Redmi A3 हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, फीचर्स पाहून यूजर झाले हैराण

Vivo V30 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत अंदाजे 33,990 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला आकर्षक अशा Bloom White, Waving Aqua, Lush Green, Noble Black चार कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

valentine day निमित्त Realme Narzo 60x हा स्मार्टफोन मिळतोय फक्त 10,999 रुपयांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *