Samsung Galaxy XCover 7 : लोखंडासारखा मजबूत हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि किंमत पहा

Samsung Galaxy XCover 7
Samsung Galaxy XCover 7 : लोखंडासारखा मजबूत हा स्मार्टफोन झाला लॉन्च, फीचर्स आणि किंमत पहा

सॅमसंगने मजबूत ताकदीचा Samsung Galaxy XCover 7 फोन लॉन्च केला आहे. एक-दोन नव्हे तर अनेक फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन स्टँडर्ड एडिशन आणि एंटरप्राइझ एडिशनमध्ये उपलब्ध आहे.

Galaxy हा फोन मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशनसह येतो आणि पुश-टू-टॉक, बारकोड स्कॅनिंग आणि विशिष्ट ॲप्लिकेशन्स यासारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

Galaxy X Cover 7 फीचर्स 

60 Hz रिफ्रेश रेट असलेल्या या फोनमध्ये 6.6 इंच फुल-एचडी टीएफटी डिस्प्ले आहे, डिस्प्ले प्रोटेक्शन साठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ वापरला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये 6nm आधारित ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, परंतु सध्या कंपनीने या डिव्हाइसमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसरच्या नावाचा खुलासा केलेला नाही.

या फोनमध्ये MediaTek Dimension 6100 प्रोसेसर वापरण्यात आला असण्याची शक्यता आहे. याला मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेट मिळाले आहे, म्हणजे फोन पडला तर खराब होत नाही. फोनचे वजन 240 ग्रॅम आहे.

Galaxy XCover 7 कॅमेरा आणि बॅटरी 

Galaxy XCover 7 मध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा आहे. समोर 5 मेगापिक्सेल शूटर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 4,050 mAh ची बॅटरी असेल.

हे पण वाचा – Lava Yuva 3 हा स्मार्टफोन येऊन धडकणार आहे भारतीय बाजारात, किंमत पाहून युजर झाले हैराण

Galaxy XCover 7 स्पेसिफिकेशन 

या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi Direct, 5G, Wi-Fi 802.11 सपोर्ट, पोगो पिनसह USB टाइप-सी पोर्ट, NFC आणि GPS सपोर्ट आहे. या फोनमध्ये XCover Key प्रदान करण्यात आली असून ही की तुम्हाला अनेक कामे पूर्ण करण्यात मदत करेल. यामध्ये शानदार आवाजासाठी डॉल्बी ॲटमॉस साउंड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  फोनमध्ये 128GB ऑनबोर्ड स्टोरेज आहे जे SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. 

Galaxy XCover 7 किंमत 

Samsung Xcover 7 दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्याची किंमत अनुक्रमे 27,208 रुपये आणि 27,530 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनी Galaxy XCover7 Enterprise Edition वर Knox Suite ची 12 महिन्यांची सदस्यता देखील देत आहे. याशिवाय, ग्राहकांना स्टँडर्ड एडिशनवर 1 वर्षाची वॉरंटी आणि एंटरप्राइझ एडिशनवर 2 वर्षांची वॉरंटी दिली जाईल.

Vivo V30 : 50 MP सेल्फी कॅमेरा, Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असा पावरफुल स्मार्टफोन झाला लॉन्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *