Samsung Galaxy F15 हा स्मार्टफोन झाला लॉन्च,6000mAH ची पावरफूल बॅटरी पहा फीचर्स

Samsung Galaxy F15
Samsung Galaxy F15 हा स्मार्टफोन झाला लॉन्च,6000mAH ची पावरफूल बॅटरी पहा फीचर्स

भारतीय बाजारपेठेत दररोज वेगवेगळ्या स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी नवीन काहीतरी फीचर्स घेऊन बाजारपेठेत उतरत असते. सॅमसंग ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन प्रेमी नवीन स्मार्टफोन लॉन्च होण्याची वाटच पाहत असतात.

या कंपनीचा प्रत्येक स्मार्टफोन दमदार फीचर्स घेऊन आलेला असतो. पण कंपनीने त्यांचा Samsung Galaxy F15 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 50 मेगापिक्सल दमदार कॅमेरा आणि बरेच काही फीचर्स मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती.

Samsung Galaxy F15 फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2340 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 6100+ हा चिप शेठ दिला गेला आहे.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 4GB RAM, 128GB 6GB RAM इंटरनल स्टोरेज असणारे असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिल्या गेला आहे.

Samsung Galaxy F15 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6000mAH ची बॅटरी 25W चार्जिंग सपोर्टसह दिली गेली आहे.

हे पण वाचा – अखेर येऊन धडकला Nothing Phone 2a हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत, किंमत देखील आहे 25,000 रुपयांपेक्षा कमी

Samsung Galaxy F15 किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीवर विचार केला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये एवढे ठेवली गेली आहे. हा स्मार्टफोन 11 मार्चपासून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन आपल्याला Ash Black, Groovy Violet, Jazzy Green या तीन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Poco C61 हा स्मार्टफोन लॉन्च होणार कमी किमतीत, मिळत आहेत दमदार फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *