Samsung Galaxy F15 5G लवकरच धडकणार आहे, भारतीय बाजारपेठेत खूपच चर्चेचा विषय ठरला

Samsung Galaxy F15 5G
Samsung Galaxy F15 5G लवकरच धडकणार आहे, भारतीय बाजारपेठेत खूपच चर्चेचा विषय ठरला

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. Samsung ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या कंपनीने नुकताच लॉन्च केलेला samsung S24 ultra हा स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलेटीसह भारतीय बाजारपेठेत आला होता. या कंपनीची फॅन फॉलोइंग सुद्धा खूपच जास्त आहे. हे स्मार्टफोन कंपनी लागलीच Samsung Galaxy F ही सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

या सिरीज मधील Samsung Galaxy F15 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये स्मार्टफोन प्रेमींच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Samsung Galaxy F15 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 700 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि MediaTek’s Dimensity 6100+ हा चीप सेट दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर हे दिला जाऊ शकतो.

Samsung Galaxy F15 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल.

एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 13 मेगापिक्सल चा फ्रेंड कॅमेरा ही दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 6000mAH ची बॅटरी 35W चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – 9,000 रुपयांपेक्षाही स्वस्त मिळतोय infinix hot 40i हा स्मार्टफोन, 32 मेगापिक्सलचा दमदार असा कॅमेरा

Samsung Galaxy F15 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 26,000 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर थोडे थांबाच कारण हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Nokia Play 2 Max लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत, स्मार्टफोन प्रेमी बघत आहेत वाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *