Redmi A3 हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, फीचर्स पाहून यूजर झाले हैराण

Redmi A3
Redmi A3 हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, फीचर्स पाहून यूजर झाले हैराण

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Redmi ही एक स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून कार्यरत आहे. या स्मार्टफोन कंपनीने अनेक स्मार्टफोन युजर्सच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या स्मार्टफोन कंपनीचे स्मार्टफोन दमदार बॅटरी बॅकअप साठी ओळखले जातात. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचे काही स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये देखील सादर केले आहेत. नुकताच लॉन्च केलेला Redmi A2 हा स्मार्टफोन खूपच विक्री झाला आहे. लागलीच या स्मार्टफोन कंपनीने Redmi A3 हा स्मार्टफोन लॉन्च करण्याचे ठरवले आहे.

कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. तरीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळवून आम्ही तुम्हाला या स्मार्टफोन बद्दल खूप माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती विषयी अधिक माहिती.

Redmi A3 फीचर्स

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.71 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1600×720 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि MediaTek SoC हा चीप सेटदिला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप चीप सेट बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो, तसेच डिस्प्ले च्या सुरक्षिततेसाठी Gorilla Glass protection देखील दिला जाऊ शकतो.

Redmi A3 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सलचा रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचं झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 10W चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – Realme Note 1 5G हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, मिळतोय 108 मेगापिक्सल चा दमदार कॅमेरा

Redmi A3 किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 17,999 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल आणि तुमचा बजेट एवढा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Vivo या स्मार्टफोन कंपनीने गुपचूप लॉन्च केला Vivo V30 5G हा स्मार्टफोन, भारतीय बाजारपेठेत उडतोय धुमाकूळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *