Realme Note 1 5G हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, मिळतोय 108 मेगापिक्सल चा दमदार कॅमेरा

Realme Note 1 5G
Realme Note 1 5G हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, मिळतोय 108 मेगापिक्सल चा दमदार कॅमेरा

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या बऱ्याच काळापासून कार्यरत आहेत. या स्मार्टफोन कंपन्या त्यांचे दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घेऊन येत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Realme ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेमध्ये वर्चस्व गाजवत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन खूपच आकर्षक आणि मनमोहक असतात. या स्मार्टफोन कंपनीने Realme Note 1 हा स्मार्टफोन लॉन्च करायचे ठरले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे माहिती मिळाल्याप्रमाणे, या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा खूपच सुंदर आनंद घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती विषयी अधिक माहिती.

Realme Note 1 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67  इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2412  एवढ्यापेक्षा पिक्सल रिझोल्युशनला सपोर्ट करू शकतो. Andriod 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa Core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 7050 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

Realme Note 1 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, मी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – Vivo V30 : 50 MP सेल्फी कॅमेरा, Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर असा पावरफुल स्मार्टफोन झाला लॉन्च

Realme Note 1 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेमध्ये अंदाजे किंमत 19,990 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Redmi A3 हा स्मार्टफोन लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च, फीचर्स पाहून यूजर झाले हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *