Realme 12x 5G हा स्मार्टफोन होत आहे लॉन्च, फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी पाहून व्हाल दंग

Realme 12x 5G
Realme 12x 5G हा स्मार्टफोन होत आहे लॉन्च, फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी पाहून व्हाल दंग

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी आपल्या स्मार्टफोन कंपनीचे नाव मोठे करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असते. भारतीय बाजारपेठेत नवीन लॉन्च झालेला स्मार्टफोन घेण्यासाठी स्मार्टफोन प्रेमींची खूपच गर्दी होते. भारतीय बाजारपेठ ही स्मार्टफोन साठी महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व असणाऱ्या Realme या स्मार्टफोन कंपनी चे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच प्रसिद्ध आहेत.

या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स साठी ओळखले जातात. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा Realme 12x 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Realme 12x 5G फीचर्स

स्मार्टफोनच्या फीचर संबंधीत विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्ट फोनचा डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 6100+ हा चिपसेट दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 256GB 12GB RAM, 512GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असणारे असे दोन व्हेरीएंट पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोन चालू खूपच दमदार असेल.

Realme 12x 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफी साठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या कॅमेरा सेटअप मध्ये 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चा ही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5000mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन आपल्याला Dark Green, Green या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो.

Realme 12x 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनचे अंदाजे किंमत 16,499 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला भारतीय बाजारपेठेमध्ये 7 एप्रिल पासून खरेदी करण्यास मिळू शकतो. सध्या एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Poultry Farming Scheme; महाराष्ट्रातील युवकांना मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *