Realme 12 pro हा स्मार्टफोन झाला भारतीय बाजारपेठेत लॉन्च, विकत घेण्यासाठी वाढली गर्दी

Realme 12 pro
Realme 12 pro हा स्मार्टफोन झाला भारतीय बाजारपेठेत लॉन्च, विकत घेण्यासाठी वाढली गर्दी

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांचे नवनवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि बॅटरी बॅकअप सह बाजारात उतरत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Realme ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन युजरच्या मनावर राज्य करत आहे. या स्मार्टफोन कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलिटी साठी ओळखले जातात. या कंपनीच्या स्मार्टफोनवर ठराविक कालावधीत डिस्काउंट सुद्धा दिले जातात.

या स्मार्टफोन कंपनीचा Realme 12 pro हा स्मार्टफोन नुकताच लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला दमदार कॅमेरा क्वालिटी आणि तगडे असे फीचर्स दिले जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Realme 12 pro फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2412 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनस सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये Octa-core प्रोसेसर आणि Qualcomm SM6450 Snapdragon 6 Gen 1 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन वेरियंट पाहायला मिळतात. या स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे.

हे पण वाचा – OnePlus Nord CE 4 Lite हा स्मार्टफोन होणार लॉन्च, भल्या भल्यांच्या पळाले तोंडचे पाणी

Realme 12 pro कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल+ 32 मेगापिक्सल +8 मेगापिक्सल असा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये एल इ डी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 19 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो.

Realme 12 pro किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 24,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. हा स्मार्टफोन आपल्याला Submarine Blue, Navigator Beige या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे 20,000 रुपयांची सूट, विकत घेण्यासाठी युजर्स करत आहेत गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *