Realme 12+ 5G हा स्मार्टफोन 6 मार्च रोजी येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, ठरला चर्चेचा विषय

Realme 12+ 5G
Realme 12+ 5G हा स्मार्टफोन 6 मार्च रोजी येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, ठरला चर्चेचा विषय

भारतीय बाजारपेठेत आणि स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन स्मार्टफोन घेऊन बाजारपेठेत उतरत आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीचा हा स्मार्टफोन वेगळं काहीतरी घेऊन येत असतो. नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोन घेण्याची उत्सुकता भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन युजरची सतत असते. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Realme ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहे.

या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी साठी ओळखले जातात. ही कंपनी Realme 12, 12+ 5G हे स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Realme 12+ 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 7050 5G हा चीप सेट दिला जाऊ शकतो.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगर प्रिंट सेन्सर देखील दिला जाऊ शकतो.

Realme 12+ 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते. कंपनीने अद्याप याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

हे पण वाचा – Asus या कंपनीचा Zenfone 11 Ultra हा स्मार्टफोन लवकरच येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत

Realme 12+ 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 19,999 रुपये एवढी असू शकते. या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Nothing Phone 2a हा स्मार्टफोन येतोय 5 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, पहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *