लवकरच लॉन्च होणार Pova 6 Pro 5G हा गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या किमती बद्दल अधिक माहिती

Pova 6 Pro 5G
लवकरच लॉन्च होणार Pova 6 Pro 5G हा गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या किमती बद्दल अधिक माहिती

भारतीय बाजारपेठेत एक से बढकर एक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक कंपनीचा स्मार्टफोन हा वेगळे फीचर्स घेऊन आलेला असतो. प्रत्येक स्मार्टफोन मध्ये काही ना काहीतरी वेगळी खासियत असते. प्रत्येक स्मार्टफोन कंपनीला असे वाटते की आपला स्मार्टफोन हा बाजारात नाव गाजवला पाहिजे. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Tecno ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.

या कंपनीचे स्मार्टफोन देखील अतिशय सुंदर डिझाईन आणि दमदार बॅटरी बॅकअप सोबत येतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा Pova 6 Pro 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Pova 6 Pro 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2436 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 6080 हा चीप सेट दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 256GB 8GB RAM, 256GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो.

Pova 6 Pro 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, त्या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यामध्ये 108 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये Dual एलईडी फ्लॅशचाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 6000mAH ची बॅटरी 70W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन 50 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – 8,999 रुपयांमध्ये मिळवा Tecno Spark 20C, हा दमदार स्मार्टफोन

Pova 6 Pro 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनचे अंदाजे किंमत 14,999 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन आपल्याला Comet Green, Meteorite Grey या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

iQoo Z9 5G हा स्मार्टफोन लवकरच घालणार भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ, 64 मेगापिक्सल च्या कॅमेराचाही समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *