Poultry Farming Scheme; महाराष्ट्रातील युवकांना मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती…

Poultry Farming Scheme

महाराष्ट्र सरकारने कुक्कुटपालन ही योजना सुरू केली आहे. दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातर्फे कुक्कुटपालन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यामध्ये तरुणांची बेरोजगारी वाढत आहे. तसेच शेतकरी वर्ग मोठा आहे. हे लक्षात घेऊन कुक्कुटपालन योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये तरुण युवकांना संधी आहे इच्छुक युवकांना 75% पर्यंत आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले जाते. कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून सुरु करता येतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. यामधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.

Poultry Farming Scheme योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद हे या योजनेची अंमलबजावणी करणार आहेत. महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागातर्फे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे अशा युवकांसाठी ही योजना उपयुक्त आहे. या योजनेतर्फे दिली जाणारी अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

कोणाला किती मिळणार लाभ

खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून 50% रक्कम मर्यादित आहे. म्हणजेच प्रति युनिट 2 लाख 25 हजार रुपये प्रकल्प खर्चासाठी 1,12,500/- रुपये मर्यादित आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या युवकांसाठी या योजनेच्या माध्यमातून 75% रक्कम मर्यादित आहे. म्हणजेच 1,68,750/- एवढी रक्कम अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. उर्वरित रक्कम लाभार्थ्याला स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उपलब्ध करायची आहे.

बँक खुल्या प्रवर्गातील युवक लाभार्थ्यांना 40% कर्ज देणार आहे. व उर्वरित 10% हिस्सा हा लाभार्थ्याला उभारायचा आहे. प्रमाणे अनुसूचित जाती-जमातीच्या युवक लाभार्थ्याला किमान 5% स्वहिताचा उर्वरित 20 टक्के रक्कम बँक उपलब्ध करून देणार आहे.

आवश्यक कागदपत्रे पहा

जमिनीचा 7/12 व 8अ, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक खात्याचा तपशील, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शपथपत्र

हे पण वाचा – Realme 12x 5G हा स्मार्टफोन होत आहे लॉन्च, फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी पाहून व्हाल दंग

येथे करा अर्ज

अर्जदाराने जिल्हा अधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन योजनेचा अर्ज घ्यावा. प्रजात दिलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. व अर्ज कार्यालयात जमा करावा त्यानंतर जिल्हाधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करून तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात की नाही तपासून पात्र असल्यास तुम्हाला लाभ मिळतो.अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सरकार Poultry Farming Scheme च्या अधिकृत संकेतस्थळावर पहा.

Lakhpati Didi Yojana: मोदी सरकार 3 कोटी महिलांना बनवणार ‘लखपती’, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळणार फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *