OnePlus Nord N30 SE हा स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत फक्त आणि फक्त 13,499 रुपये

OnePlus Nord N30 SE
OnePlus Nord N30 SE हा स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत फक्त आणि फक्त 13,499 रुपये

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्या नवनवीन स्मार्टफोनचे उत्पादन करत आहे. अशा अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि दमदार फीचर्स सह भारतीय बाजारपेठेत आले आहेत. या स्मार्टफोन कंपन्यापैकीच एक OnePlus हे स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा क्वालिटी आणि पावरफुल बॅटरी बॅकअप साठी ओळखले जातात.

या स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारपेठेत OnePlus Nord N30 SE हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करायचे ठरवले आहे. हा स्मार्टफोन आपल्याला लवकरच भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळू शकतो. हा स्मार्टफोन Black Satin, Cyan या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन विषयी अधिक माहिती.

OnePlus Nord N30 SE फीचर्स

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.72 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. हा स्मार्टफोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असून, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 6020 हा चीप सेट दिला गेला आहे.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित बोलायचे झाले तर 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. डिवाइस च्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाऊ शकतो.

OnePlus Nord N30 SE कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप शकतो, त्यामध्ये एलईडी फ्लॅशचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन केवळ 30 मिनिटांमध्ये 51% चार्ज होऊ शकतो.

हे पण वाचा – Tecno Spark 20 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, किंमत पाहून युजर्स झाले हैराण

OnePlus Nord N30 SE किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला आहे. भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 13,499 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.

Nothing Phone 2a हा स्मार्टफोन येताच, भारतीय बाजारपेठेत उडणार धुरळा फीचर्स आहेत दमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *