Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन धडकणार लवकरच भारतीय बाजारपेठेत, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहून व्हाल दंग

Lava Blaze Curve 5G
Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन धडकणार लवकरच भारतीय बाजारपेठेत, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप पाहून व्हाल दंग

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. भारतीय बाजारपेठ स्मार्टफोन साठी खूपच प्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते. भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Lava ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे. या कंपनीचे स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत खूपच विकले जातात.

ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा Lava Blaze Curve 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Lava Blaze Curve 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1250 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि MediaTek Dimensity 7050 हा चिप सेट दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा – Realme 12+ हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच सुरू झाली आडवांस बुकिंग, स्पेसिफिकेशन पाहून उडाले स्मार्टफोन प्रेमींचे होश

Lava Blaze Curve 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असू शकतो. एवढेच नाही तर सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही दिल्या जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 5000mAH ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली जाऊ शकते.

Lava Blaze Curve 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 15,999 रुपये ठेवले जाऊ शकते. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कंपनीने कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

8,999 रुपयांमध्ये मिळवा Tecno Spark 20C, हा दमदार स्मार्टफोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *