Lakhpati Didi Yojana: मोदी सरकार 3 कोटी महिलांना बनवणार ‘लखपती’, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळणार फायदा

आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या बाबतीत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना महिलांबद्दल अनेक योजनांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये लखपती दीदी ही एक आहे. ही योजना जनतेपर्यंत पोहोचताच त्याचा लाभ घ्यायला लोकांनी चालू केला आहे. या योजनेमध्ये आपल्या देशातील महिलांना 0% व्याजदरावर एक लाख ते पाच लाख पर्यंत कर्ज मिळते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वातंत्र्य बनवणे हा यामागचा उद्देश आहे. गेल्या वर्षीपर्यंत 2 कोटी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत होत्या मात्र, यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्यांनी या योजनेसाठी लोकांचा प्रतिसाद पाहून 2 कोटी वरून 3 कोटी पर्यंत संख्या जाहीर केली आहे. स्त्रीमुळे कुटुंबाला हातभार लागेल व कुटुंबाचे उत्पन्न लाखापर्यंत जाणार असल्याने नीला लखपती दीदी म्हटले आहे. या योजनेसाठी एक अट आहे ती म्हणजे की, या योजन चा लाभ फक्त बचत गटाच्या महिला घेऊ शकतात.

निमकी काय काम करते ही योजना:-

या योजनेमधून बचत गटाच्या महिलांना एक लाख ते पाच लाख पर्यंतचे कर्ज तेही 0% व्याजदरावर उपलब्ध करून दिले जाते. हा या योजनेचा मोठा लाभ आहे. या योजनेतून महिलांना करून नवनवीन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होईल. त्यांचे मनोबल वाढेल. त्या स्वतः सक्षम होतील आणि त्यांच्या कुटुंबाचा खर्च त्यासोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागवू शकतील.

हे पण वाचा – Poultry Farming Scheme; महाराष्ट्रातील युवकांना मोठी संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती…

महिलांसाठी मोठा फायदा काय

महिलांना यात 0% व्याज दरावर कर्ज मिळतेच त्यासोबतच नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. खर्च देऊनही त्यांना बचत करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायाला कमी खर्चात विमा सुरक्षिततेची दिली जाते. अगदी बाजारपेठा पर्यंत सुद्धा मदत पुरवली जाते. योजना महिलांसाठी अत्यंत फायद्याची आहे. या योजनेचा लाभ घेतल्यामुळे महिलेच्या सर्व कुटुंबाचा विकास होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करून दिले जातात व त्यात मार्गदर्शन केले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

ही योजना फक्त महिलांसाठीच आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला स्वतः बचत गटाची सदस्य असली पाहिजे . महिलेचे वय 18 ते 50 वर्षे वयोगटात असले पाहिजे. महिले चे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. या सर्व अटी योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहेत. या योजनेला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी,उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक डिटेल्स, पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज करण्यासाठी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाचा च वापर करावा आणि त्यावरून अधिक माहिती मिळवावी.

OnePlus Nord CE4 हा स्मार्टफोन येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, स्पेसिफिकेशन पाहून पठार प्रेमात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *