9,000 रुपयांपेक्षाही स्वस्त मिळतोय infinix hot 40i हा स्मार्टफोन, 32 मेगापिक्सलचा दमदार असा कॅमेरा

infinix hot 40i
9,000 रुपयांपेक्षाही स्वस्त मिळतोय infinix hot 40i हा स्मार्टफोन, 32 मेगापिक्सलचा दमदार असा कॅमेरा

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणून काही ना काही डिस्काउंट दिले आहे. प्रत्येक कंपनीच्या स्मार्टफोन मध्ये नवीन दमदार फीचर्स असतोच तरी देखील स्मार्टफोन कंपन्या नवीन लॉन्च झालेल्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देत आहेत. अशाच स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक infinix ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.

या कंपनीने नुकताच लॉन्च केलेला infinix hot 40i हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सह येतो. या स्मार्टफोनच्या किमती देखील कंपनीने आणि तसेच ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट कंपनीने या स्मार्टफोनवर डिस्काउंट देण्याचे ठरवले आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

infinix hot 40i फीचर्स

या स्मार्टफोनचे फीचर्स पाहायला गेले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 480 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 720 x 1612 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Unisoc T606 हा चीफ सेट दिलेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तरी या स्मार्टफोनमध्ये 128GB 4GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनेट स्टोरेज असलेले असे तीन व्हेरिएंट पाहायला मिळतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिलेला आहे.

infinix hot 40i कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल आणि 0.08 मेगापिक्सल ची auxilary lens दिली गेली आहे, ज्यामध्ये एलईडी फ्लॅशचा चाही समावेश आहे.

एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी दमदार असा 32 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 18W चार्जिंग सपोर्ट दिली गेली आहे.

हे पण वाचा – Redmi Note 12 Pro 5G हा स्मार्टफोन झाला लॉन्च, पहा फीचर्स आणि किंमत

infinix hot 40i किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, हा स्मार्ट फोन लॉन्च झाला तेव्हा भारतीय बाजारपेठेमध्ये या स्मार्टफोनची किंमत 9,799 रुपये एवढी ठेवली गेली होती. परंतु 21 फेब्रुवारी रोजी हा स्मार्टफोन आपल्याला 9,000 रुपयांपेक्षाही स्वस्त किमतीत मिळेल. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू करू शकतो.

Samsung Galaxy F15 5G लवकरच धडकणार आहे, भारतीय बाजारपेठेत खूपच चर्चेचा विषय ठरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *