10,000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी किमतीत Moto G24 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, 7 फेब्रुवारी पासून करता येईल खरेदी

Moto G24
10,000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी किमतीत Moto G24 हा स्मार्टफोन झाला लॉन्च, 7 फेब्रुवारी पासून करता येईल खरेदी

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या दमदार कॅमेरा क्वालिटी आणि फीचर्स असलेल्या स्मार्टफोनवर भरपूर डिस्काउंट दिला गेला होता. परंतु काही स्मार्टफोन कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट देण्याचे ठरवले आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन कंपन्या कार्यरत आहेत. अशा स्मार्टफोन कंपनी यापैकी एक Motorola ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे.

या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G24 हा लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहेत. आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून माहिती मिळाल्याप्रमाणे हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती विषयी अधिक माहिती.

Moto G24 फीचर्स

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 537 nits एवढ्या ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 720 x 1612 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek MT6769Z Helio G85 हा चिप सेट दिला गेला आहे.

ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो. या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये 128GB 4GB RAM, 128GB 8GB RAM असे इंटरनल स्टोरेज असलेले दोन वेरियंट पाहायला मिळू शकतात. डिवाइसच्या सुरक्षिततेसाठी या स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर ही दिला जाऊ शकतो.

Moto G24 कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा कॉलिटी बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो ,यामध्ये एलईडी फ्लॅशचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्ट सह दीदी जाऊ शकते.

हे पण वाचा – Vivo Y200 5G हा स्मार्टफोन झाला अपग्रेड, इंटरनल स्टोरेज वाढला 256GB पर्यंत युजर झाले हवालदिल

Moto G24 किंमत

हा स्मार्टफोन आपल्याला Matte Charcoal, Ice Green, Blueberry, Pink Lavender या तीन कलर वेरीएंट मध्ये पाहायला मिळू शकतो. अशा प्रीमियम लुक मधील स्मार्टफोनच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर, ही स्मार्टफोन कंपनी लो बजेट सेगमेंट स्मार्टफोनसाठी ओळखली जाते.

या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये असण्याची दाट शक्यता आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 7 फेब्रुवारी रोजी विकत घेता येईल. जर तुम्हाला सुद्धा एखादा लो बजेट सेगमेंट मध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

iQOO Neo 9 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत घालणार धुमाकूळ, 22 फेब्रुवारी रोजी होतोय लॉन्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *