अखेर येऊन धडकला Nothing Phone 2a हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत, किंमत देखील आहे 25,000 रुपयांपेक्षा कमी

Nothing Phone 2a
अखेर येऊन धडकला Nothing Phone 2a हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत, किंमत देखील आहे 25,000 रुपयांपेक्षा कमी

भारतीय बाजारपेठेत रोज नवीन काही ना काहीतरी डिझाईन घेऊन प्रत्येक स्मार्टफोन कंपनी त्यांचे नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असते. प्रत्येक कंपनीला असे वाटते की आपण दमदार डिझाईन दिल्यानंतर आपला स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत जास्त विकला जाईल आणि आपल्या कंपनीचे नाव मोठे होईल. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी त्यांच्या कंपनीचा सेल वाढवण्यासाठी काम करत असते. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक Nothing स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत कार्यरत आहे.

या कंपनीने आज त्यांचा Nothing Phone 2a हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची डिझाईन खूपच दमदार आहे. या स्मार्टफोनच्या बॅक साइटवर एलईडी फ्लॅश लाईट आहेत. ह्या एलईडी फ्लॅश लाइट्स स्मार्टफोन युजर्सचे मन आकर्षित करून घेतात. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

Nothing Phone 2a फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1084×2412 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि MediaTek Dimensity 7200 हा चीप सेट दिला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनच्या डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी Corning Gorilla Glass हा ग्लास दिला गेला आहे.

Nothing Phone 2a कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी संबंधी विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला गेला आहे, यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश आहे. एवढेच नाही तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4500mAH ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे.

हे पण वाचा – तब्बल 2,000 रुपयांनी स्वस्त झाला Oneplus 11R हा स्मार्टफोन, पाहून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone 2a किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत 23,999 रुपये ठेवली गेली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दमदार फीचर्स देऊनही कमी किमतीत सादर केला आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमच्या बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Samsung Galaxy F15 हा स्मार्टफोन झाला लॉन्च,6000mAH ची पावरफूल बॅटरी पहा फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *