iQoo Z9 5G हा स्मार्टफोन लवकरच घालणार भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ, 64 मेगापिक्सल च्या कॅमेराचाही समावेश

iQoo Z9 5G
iQoo Z9 5G हा स्मार्टफोन लवकरच घालणार भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ, 64 मेगापिक्सल च्या कॅमेराचाही समावेश

भारतीय बाजारपेठेत रोज नवीन नवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. प्रत्येक कंपनीला असं वाटत आहे की आपण लॉन्च केलेला स्मार्टफोन खूप विकला गेला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक कंपनी लॉन्च करणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दमदार फीचर्स आणि कॅमेरा क्वालिटी मध्ये चेंजेस करत असते. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक iQoo ही स्मार्टफोन कंपनी बऱ्याच काळापासून भारतीय बाजारपेठेत राज्य करत आहे.

या कंपनीची फॅन फॉलोविंग देखील भारतीय बाजारपेठेत खूपच वाढली आहे. ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा iQoo Z9 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6000mAH ची बॅटरी पाहायला मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

iQoo Z9 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.78 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. एवढेच नव्हे तर या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1920×1080 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये octa-core प्रोसेसर आणि MediaTek Dimensity 7200 SoC हा चीप सेट दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर ही दिला जाऊ शकतो.

iQoo Z9 5G कॅमेरा आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप असू शकतो, यामध्ये एल इ डी फ्लॅश चाही समावेश असू शकतो. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा ही दिला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6000mAH ची बॅटरी 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट सहज दिली जाऊ शकते.

हे पण वाचा – लवकरच लॉन्च होणार Pova 6 Pro 5G हा गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या किमती बद्दल अधिक माहिती

iQoo Z9 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची अंदाजे किंमत 24,499 रुपये असू शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Vivo v30 lite हा स्मार्टफोन येऊन धडकू शकतो 7 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत, 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *