भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या नवनवीन स्मार्टफोनचे उत्पादन वाढवले आहे. प्रत्येक स्मार्टफोन प्रेमीला असे वाटत आहे की नवीन दमदार कॅमेरा कॉलेटी असलेला स्मार्टफोन आपल्याकडे देखील असावा. अशा स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक नुकतेच भारतीय बाजारपेठेत धुरळा घालणारे Nothing ही स्मार्टफोन कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे.
या स्मार्टफोनचे नाव Nothing Phone 2a असे ठेवण्यात आले आहे. हा स्मार्टफोन आपल्याला बजेट सेगमेंट मध्ये मिळू शकतो. हा स्मार्टफोन येत्या काही दिवसातच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होईल. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि लॉन्चिंग डेट विषयी अधिक माहिती.
Nothing Phone 2a फीचर्स
या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो की 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 1080 x 2412 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येऊ शकतो. Android 14 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित या स्मार्टफोन मध्ये octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 7200 हा चीफ सेट दिला जाऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला खूपच तगडा परफॉर्मन्स मिळू शकतो.
या स्मार्टफोनच्या स्टोरेज संबंधित विचार केला गेला तर या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 8GB RAM, 256GB 12GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे दोन व्हेरिएंट पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंटरही दिला जाऊ शकतो.
Nothing Phone 2a कॅमेरा आणि बॅटरी
या स्मार्टफोनच्या कॅमेरा क्वालिटी बद्दल विचार केला गेला तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी Dual रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सल+ 50 मेगापिक्सल असा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये एलईडी फ्लॅश चाही समावेश असेल. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला जाऊ शकतो.
या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप संबंधित विचार केला गेला तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी जाऊ शकते. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या चार्जिंग विषयी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही.
हे पण वाचा – Realme 12+ 5G हा स्मार्टफोन 6 मार्च रोजी येऊन धडकणार भारतीय बाजारपेठेत, ठरला चर्चेचा विषय
Nothing Phone 2a किंमत
या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनची किंमत अंदाज 35,499 रुपये एवढे असू शकते. या स्मार्टफोनच्या किमती बद्दल कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये 5 मार्च रोजी लॉन्च होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा असा दमदार स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
Redmi Note 12 Pro 5G हा स्मार्टफोन झाला लॉन्च, पहा फीचर्स आणि किंमत