Oppo A79 5G आणि OPPO A78 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे तब्बल 1,000 रुपयांची सूट

OPPO A78 5G
Oppo A79 5G आणि OPPO A78 5G या स्मार्टफोनवर मिळत आहे तब्बल 1,000 रुपयांची सूट

भारतीय बाजारपेठेत OPPO या स्मार्टफोन कंपनीने बऱ्याच काळापासून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या कंपनीचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा कॉलेटी साठी ओळखले जातात. कंपनीने आपल्या चाहत्यांसाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त नुकत्याच लॉन्च झालेल्या 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. कंपनीने OPPO A79 5G आणि OPPO A78 5G फोनच्या किमतीत तब्बल 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

या स्मार्टफोनच्या किमतीत कपात झाल्यानंतर हे दोन्हीही स्मार्टफोन नवीन रेट मध्ये विकले जात आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन घेण्यासाठी स्मार्टफोनच्या चाहत्यांची, स्मार्टफोन विकत घेण्यासाठी उत्सुकता खूपच वाढले आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किमती बद्दल अधिक माहिती.

OPPO A78 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.56 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 600 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 720 x 1612 एवढ्या पिक्सल रिझोल्युशन सह येतो. Android 12 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित असे स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 700 हा चीप सेट दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 128GB 4GB RAM, 128GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज सह दोन मध्ये पाहायला मिळतो.

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. एवढेच नव्हे तर सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAH ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 67 मिनिटांमध्ये 100% चार्ज होऊ शकतो. हा स्मार्टफोन आपल्याला Glowing Black, Glowing Purple या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो.

Oppo A79 5G फीचर्स

या स्मार्टफोनच्या पिक्चर संबंधित बोलायचे झाले तर, या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 6.72 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. जो की 90Hz रिफ्रेश रेट आणि 680 nits ब्राईटनेस ला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले 1080 x 2400 एवढ्या पिक्सल रिझोल्युशनसह येतो. Android 13 ऑपरेटिंग सिस्टिम वर आधारित या स्मार्टफोनमध्ये Octa-core प्रोसेसर आणि Mediatek Dimensity 6020 हा चीप सेट दिला गेला आहे.

या स्मार्टफोन मध्ये आपल्याला 128GB 4GB RAM, 128GB 8GB RAM, 256GB 8GB RAM इंटरनल स्टोरेज असलेले असे तीन वेरीएंट पाहायला मिळू शकतात. या स्मार्टफोन मध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल असा कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. सेल्फी साठी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही दिला गेला आहे.

या स्मार्टफोनच्या बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर, डिवाइस ला पावर देण्यासाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAH ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह दिली गेली आहे. कंपनीचा असा दावा आहे की हा स्मार्टफोन अवघ्या 30 मिनिटांमध्ये 51% चार्ज होऊ शकतो. हा स्मार्टफोन आपल्याला Mystery Black, Glowing Green या दोन कलर ऑप्शन मध्ये पाहायला मिळतो.

हे पण वाचा – Redmi A3 लो बजेट सेगमेंट मध्ये असून सुद्धा या स्मार्टफोन मध्ये आहेत दमदार फीचर्स, लवकरच होणार भारतीय बाजारपेठेत लॉन्च

Oppo A79, A78 5G किंमत

या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला गेला तर, OPPO A79 5G या स्मार्टफोनची 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरियंट ची किंमत 19,999 रुपयांवरून 18,999 रुपये करण्यात आली आहे. OPPO A78 5G या स्मार्टफोनची 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या किंमत 18,999 रुपयांपासून 17,999 रुपयांमध्ये आणली आहे.

म्हणजेच या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. जर तुम्हाला सुद्धा एखादा नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट एवढे असेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Oppo Reno 11F 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत करतोय धुरळा, 48 मिनिटात होणार 100% चार्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *