देशातील सर्वात जास्त विक्री होणारी बाईक Splendor Plus तिच्या मायलेज आणि परफॉर्मन्समुळे ओळखली जाते. Hero Motorcorp ची ही बाईक बाजारामध्ये लॉन्चिंग पासून आज पर्यंत त्याच जोराने विक्री केली जाते. कंपनीची ही बाइक जगभरात सगळ्यात जास्त विक्री होते. या बाईचे मजबुती आणि आरामदायी सफर यामुळे ही बाईक बरीच लोकांची आवडती मोटरसायकल आहे.
जर तुम्हाला सुद्धा ही बाईक खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण EMI प्लॅन घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्ही खूप कमी डाऊन पेमेंट करून ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून कमी डाऊन पेमेंट भरण्याचा ऑप्शन दिला जातो. त्यानंतर तुम्ही दरमहा EMI हप्ते भरून गाडी वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया या EMI ऑफर बद्दल अधिक माहिती.
EMI Plan
कंपनीची ही बाईक बाजारामध्ये दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे, या बाईच्या स्टॅंडर्ड व्हेरियंट ची किंमत 90,251 रुपये आणि टॉप व्हेरियंट ची किंमत 91,736 रुपये ( एक्स-शोरूम प्राईज) इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाइक सात कलर ऑप्शन मध्ये सादर केली आहे.
याच्या EMI प्लानमध्ये तुम्ही फक्त 20,000 रुपये डाऊन पेमेंट करून Hero Splendor Plus तुमच्या घरी नेऊ शकता. 3 वर्षांच्या कालावधीसाठी 12% व्याजदराने यामध्ये 2,654 रुपयांचा दरमहा हप्ता भरून तुम्ही ही बाई खरेदी करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही फक्त 20,000 रुपये भरून बाईक खरेदी करू शकता. या EMI Plan बाबत अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या डीलरशिप ची संपर्क साधू शकता.
Splendor Plus इंजिन
Splendor Plus या बाईक मध्ये तुम्हाला 97.2 cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, हे इंजिन 8,000 rpm वर 7.91bhp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 8.05nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेले आहे.या बाईकच्या सहाय्याने ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करता येतो.ही बाईक 100cc सेगमेंटमधील सर्वात आलिशान मोटरसायकल आहे.
Splendor Plus मायलेज
हे ‘XSens तंत्रज्ञान’ सह इंधन इंजेक्शन सेटअप वापरते. त्यामुळे जास्त मायलेज देण्यात ते यशस्वी झाले आहे. Hero Splendor Plus सह, तुम्ही 60 किलोमीटर प्रति लीटरपर्यंतचे मायलेज सहज मिळवू शकता.
ब्रेकिंग आणि सस्पेन्शन
Hero Splendor Plus चे हार्डवेअर आणि ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी, बाईकला समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस हायड्रॉलिक शॉक शोषकांनी नियंत्रित केले आहे. त्याचे ब्रेकिंग फंक्शन्स करण्यासाठी, दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक्स CBSE ब्रेकिंग सिस्टमसह जोडले गेले आहेत.